अमरावती, दि. : संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ, अमरावतीच्या वतीने माहे ऑगस्ट २०२६ मध्ये वाढदिवस असलेल्या सभासदांचा सामूहिक वाढदिवस सोहळा विरंगुळा केंद्र, अमरावती येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष तथा पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभाग, अकोला/अमरावतीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाचे राष्ट्रीय सहसचिव मा. श्री. पुरुषोत्तम गावंडे होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. सुरेश ठाकरे, प्रा. व्ही. आर. देशमुख, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गणेशराव चौधरी, मंडळाचे उपाध्यक्ष श्री. दामोदर पवार, सचिव डॉ. चंदनसिंह राजपूत, मार्गदर्शक प्राचार्य डॉ. दिलीपसिंह खांबरे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून झाली. श्री. अनिलराव वानखडे यांनी साने गुरुजींची 'खरा तो एकचि धर्म' ही प्रार्थना सादर केली. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मंडळाचे उपाध्यक्ष श्री. दामोदर पवार यांनी मंडळाच्या कार्याची व भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. प्रा. डॉ. दिलीपसिंह खांबरे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला व मंडळाने स्थापनेपासून राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. नुकत्याच झालेल्या आमसभेत अमृत महोत्सवी व सहस्त्रचंद्रदर्शन झालेल्या सभासदांचा तसेच जलद चालण्याच्या स्पर्धेतील विजेत्या सभासदांचा सत्कार करण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी ७ वर्षीय अध्वर्यू मोहोड, अवघा इंगोले व उत्कृष्ट निवेदिका कु. क्षिप्रा मानकर यांचाही सत्कार करण्यात आला.
आयुर्वेदाचार्य डॉ. विजय कुबडे यांचे व्याख्यान झाले
या महिन्यात वाढदिवस असलेले मंडळाचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम गावंडे, श्री. गणेशराव पाचघरे, कृष्णराव बैतुले, राजकुमार बोके, हरिदास ठाणेकर, काशिनाथ फुटाणे, दिगांबर लांडे व उद्धवराव माहुलकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रा. डॉ. सुरेश ठाकरे यांनी मंडळाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रा. व्ही. आर. देशमुख यांनी दरमहा सामूहिक वाढदिवस साजरा करण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. श्री. गणेशराव चौधरी यांनी पर्यावरण व शाश्वत विकासावर मार्गदर्शन केले. श्री. राजाभाऊ बोके यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे महत्त्व विशद केले.
अध्यक्षीय भाषणात मा. पुरुषोत्तम गावंडे यांनी शासकीय योजनांची माहिती दिली व ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याची व भविष्याची काळजी घ्यावी, आपली पुंजी स्वतःजवळच ठेवावी असा मोलाचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे आभार सचिव योगाचार्य डॉ. चंदनसिंह राजपूत यांनी मानले. यावेळी प्रा. दिलीप काळे, कोषाध्यक्ष धनराज निपाने, सहसचिव श्रीकृष्ण कुलट, डॉ. सतीश तराळ, राजाभाऊ देशमुख, संजय खोंडे, अनिल वानखडे, मधुकरराव भोपाळे, पी. एम. गावंडे आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
*डी. एस. पवार
उपाध्यक्ष, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ, अमरावती

