shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निपाणी वडगाव येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा; गावातून निघाली भव्य मिरवणूक


​वडाळा महादेव (वार्ताहार):
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे ग्रामदैवत मारुती मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक बैलपोळा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

​कार्यक्रमप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते योगेश देवकर आणि विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजय गायधने यांच्या शुभहस्ते बैलजोडीचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर श्री वीरभद्र मंदिर ते संपूर्ण गावातून वाद्यांच्या गजरात सजवलेल्या बैलजोड्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावाच्या वेशीजवळ बैलजोडीचे पूजन करून जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
​या सणानिमित्त श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार वसीम इनामदार, गृह रक्षक दलाचे राजेंद्र देसाई, माजी सरपंच रवींद्र पवार, यशवंत गायधने, माजी उपसरपंच आबासाहेब राऊत, बी. जी. गायधने सर, दत्तात्रय गोराणे, संभाजी देवकर विश्वजीत राऊत, लक्ष्मण गायधने, राजेंद्र काळे, जगन्नाथ जाधव, भाऊ पडोळे, बापू पवार, नंदू काळे, नंदू जाधव, दीपक कर्डिले, बाळू राऊत, राहुल राऊत आणि अशोक राऊत यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने बैलपोळा सण शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडला.
close