shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मॉर्डन हायस्कूलमध्ये पत्रकारितेचा गौरव; बालाजी शिंदे यांचा विशेष सत्कार

पिंपरी-चिंचवड : समाजातील विविध घडामोडी निर्भीडपणे मांडत जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा मॉर्डन हायस्कूलमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी ‘सुरक्षा पोलीस टाईम्स’चे उपसंपादक तथा ‘विशेष पोलीस न्यूज’चे संपादक आणि ‘पत्रकार मित्र मंच’चे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. बालाजी शिंदे, तसेच ‘विशेष तपास न्यूज’चे कार्यकारी संपादक श्री. नामदेव मेहेर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील वास्तव परिस्थिती प्रशासन आणि जनतेसमोर मांडण्याचे प्रभावी साधन आहे. या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अडचणी, अन्याय आणि विविध सामाजिक प्रश्नांना सातत्याने आवाज देणाऱ्या पत्रकारांच्या कार्याची यावेळी विशेष दखल घेण्यात आली.


मॉर्डन हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, शाळेचे पदाधिकारी तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सन्मानित पत्रकारांच्या सामाजिक व पत्रकारितेतील कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सन्मानाबद्दल मुख्य संपादक श्री. राजू इंगळे, कार्यकारी संपादक श्री. नामदेव मेहेर आणि कार्यकारी संपादक श्री. बालाजी शिंदे यांचे पत्रकारिता क्षेत्रासह विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

close