shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अकोले तहसील कार्यालयात १७ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन

अकोले (प्रतिनिधी):-
 अकोले येथील तहसील कार्यालय व महाराष्ट्र ग्राहक पंचायत अकोले शाखेच्या वतीने मंगळवार १७ मार्च रोजी सकाळी 10 वाजता  जागतिक ग्राहक दिनानिमित्त  ग्राहक मेळाव्याचे आयोजन तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. 

 ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुका अध्यक्ष दत्ता शेणकर, कार्याध्यक्ष महेश नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांच्या विविध विभागातील असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार असून ग्राहक दिनांत यापूर्वी अनेक ग्राहकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अकोले हा आदिवासी तालुका आहे या तालुक्यात आदिवासी व इतर बांधव मोठ्या प्रमाणात अशिक्षित आहे. शासकीय विविध दाखले, रेशनपुरवठा, वीजपुरवठा, वीज बिले, शहरी व ग्रामीण भागात गॅस पुरवठा, बी बियाणे, कृषी खते, वन खाते, कृषी खाते, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व फी आदिवासी आश्रम शाळांमध्ये दर्जेदार सुविधा मिळत नाही, सिटी सर्व्हे कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, सेतू कार्यालये, आधार, पशुसंवर्धन, पंचायत समिती, शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, राजूर प्रकल्प कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवक, एस.टी ग्राहक, सार्वजनिक बांधकाम, दूरसंचार निगम, पाटबंधारे विभाग, नगरपंचायत, बँका, कृषी उत्पन्न बाजार समिती, आरोग्य अधिकारी, वैद्य मापन शास्त्र, बालविकास प्रकल्प, परिवहन अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क व अनेक दैनंदिन कामातील सोडवणूक यावेळी करण्यात येणार आहे. अधिकारी व ग्राहक यांच्या समोरासमोर ही सोडवणूक केली जात असल्यामुळे ग्राहकांनी आपल्या तक्रारी लेखी व तोंडी सांगाव्या. या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहनही  त्यांनी केले.

  यावेळी निवासी नायब तहसीलदार किसन लोहारे, महसूल नायब तहसीलदार प्रमोद सावंत,पुरवठा निरीक्षक संदीप निळे, प्रा.डॉ.सुनील शिंदे, सिताराम भांगरे, माधवराव तिटमे, अनंत घाणे, सुनील देशमुख, राम रुद्रे, आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.
    मेळाव्यास ग्राहकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रामहरी तिकांडे, राजेंद्र घायवट, सखाराम खतोडे, भाऊसाहेब वाळुंज, राम भांगरे, दत्ता ताजणे, भाऊसाहेब वाकचौरे, प्रमोद मंडलिक, रामदास पांडे, बाळासाहेब बनकर, रामदास पवार, वसंतराव बाळसराफ, तुकाराम खाडे, जालिंदर बोडके, ज्ञानेश्वर पुंडे, कैलास तळेकर, सुदाम मंडलिक, नरेंद्र देशमुख, भाऊसाहेब गोरडे, मंगल मालुंजकर, शारदा शिंगाडे, शोभा दातखिळे, प्रतिभा सूर्यवंशी, सुरेश गभाले,अशोक उघडे, राजेंद्र लहामगे, सुमन जाधव, मच्छिंद्र चौधरी, पांडुरंग पथवे आदींनी केले आहे.
close