shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ.नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश आडस, होळ, बनसारोळा, युसुफवडगाव, चनई, मोरेवाडी ग्रामपंचायतींना नवीन इमारतीसह नागरी सुविधा कक्ष मंजूर!!

प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी :-महाराष्ट्रातील  ग्रामीण भागातील प्रशासनाला आधुनिक आणि सुसज्ज पायाभूत सुविधा मिळाव्यात या उद्देशाने राज्य सरकारने ५०० नव्या ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. या यादीत केज विधानसभा मतदार संघातील आडस, होळ, बनसारोळा, युसुफवडगाव, चनई आणि मोरेवाडी या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, या प्रस्तावासाठी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून, शासनाच्या या निर्णयामुळे या भागातील ग्रामपंचायतींना सुसज्ज व आधुनिक पायाभूत सुविधा मिळणार आहेत.



पुनर्रचित राष्ट्रीय ग्रामविकास अभियान अंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. या योजनेतून नव्या ग्रामपंचायत इमारतींसोबत नागरी सुविधा कक्षाची उभारणी केली जाणार आहे. या ठिकाणी नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले, जात प्रमाणपत्रे, पाणीबिल भरणा, निवडणूक ओळखपत्रासंदर्भातील सेवा आदी अनेक शासकीय सेवा मिळणार आहेत.

close