shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुरवडची कन्या निहारिका कोरटकर अबॅकस स्पर्धेमध्ये ठरली सुपरस्टार.

सुरवडची कन्या निहारिका कोरटकर अबॅकस स्पर्धेमध्ये ठरली सुपरस्टार.
 इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सुरवड गावची कन्या व विशाल माने सर यांच्या आय चॅम्प अकॅडमी वडापुरीतील विद्यार्थिनी निहारिका रणजीत कोरटकर  सध्या कदम गुरुकुल येथे सीबीसी इ.5 वी 
मध्ये शिकत असून तिने अकलूज येथे नुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेमध्ये 100 गणिते 2 मिनिट 40 सेकंदात सर्वांसमोर सोडवुन सुपरस्टार किताब पटकावत  प्रथम क्रमांक मिळवला. 

यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये जयसिंह मोहिते पाटील, स्वरूप राणी  मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील,हनुमंत बनसुडे, डॉ. शिल्पा फडे, लेखिका व कवयित्री नुरजहा शेख,  नितीन बनसुडे, प्राचार्य विश्वजीत माने, प्राचार्य संदीप जाधव, प्राचार्य वंदना बनसुडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ' ट्रॉफी व सायकल किताब देऊन सन्मान करण्यात  आला.

 यावेळी इतर गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले .

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास उरवणे,प्रास्ताविक रेश्मा तांबोळी तर आभार विशाल माने सर यांनी मानले.

 निहारिका रणजीत कोरटकर हिने अबॅकस  स्पर्धेमध्ये सुपरस्टार किताब मिळवला तर सीमंतिनी कोरडकर हिने सुपर इंटिजिलेंट किताब  मिळवला त्यांचे अभिनंदन वडील डॉ. रणजीत रामचंद्र कोरटकर, डॉ. रूपाली कोरटकर यांनी केले.
close