shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्व. अण्णासाहेब कानफाडे विद्यालयात गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधासाठी एच पी व्ही लसीकरणाबाबत पालकांना मार्गदर्शन

मोर्शी (प्रतिनिधी) : स्व. अण्णासाहेब कानफाडे स्मृती विद्यालय, मोर्शी येथे विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधासाठी लसीकरणाबाबत मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी यांच्या सहकार्याने पार पडला. उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील *वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोदजी पोतदार* यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी  श्री प्रकाश भाऊ मंगळे यांनी वयोगट 14 ते 15 मधील विद्यार्थिनींना व पालकांना गर्भाशय मुख कर्करोगाची कारणे, लक्षणे तसेच त्यापासून बचाव करण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. योग्य वयात लस घेतल्यास हा आजार टाळता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीपजी टिगंने, तसेच कर्मचारी श्री विनयभाऊ शेलुरे, श्री प्रशांतभाऊ बेहरे, सौ. कल्पनाताई पंधरे व सौ. पुष्पाताई पंधरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन करून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. पालकांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंका निरसन करून घेतले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री ए डी जुनघरे सर , पालक प्रतिनिधी नंदकिशोर भाऊ वडुळकर, सौ.मनीषा संतोष मोहोड, पालक वृंद, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. व्ही.व्ही.करडे यांनी तर आभार सौ.ए.एस.धांडे मॅडम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
close