राहुरी:-
राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर 409/2025 भारतीय न्याय सहिता कलम 137(2) , प्रमाणे दिनांक 11/04/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयामध्ये अपहरीत मुलीबाबत काहीएक माहिती उपलब्ध्द नसतांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे तसेच अथक परीश्रम घेवुन गुन्हयातील अपहरीत मुलीचा माग काढुन तिचा शोध घेऊन तीला राहुरी पोलीस स्टेशनला आणून सदर पीडितेस तिचे नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. व अपहरण करणारा युवकास ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव , पोकॉ. गणेश लिपने हे करत आहेत.
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मुलींचा शोध घेऊन गेल्या वर्षभरात 75 मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई मा.श्री. सोमनाथ घार्गे सो. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर , मा.श्री. सोमनाथ वाकचौरे सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर , श्री. डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे, पोसई राजू जाधव , पोकॉ.अशोक शिंदे, पोकॉ. गणेश लिपणे पोकॉ. सचिन ताजने , मपोकॉ. शितल थोरात , मीना नाचन नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर व पो.ना.संतोष दरेकर, नेमणुक अपर पोलीस अधीक्षक सो श्रीरामपुर जि.अहिल्यानगर मोबाईल सेल यांनी केलेली आहे.