मुखेड दि.4/12/2025
सामाजिक कार्यकर्ते, वडारनेते तथा काँग्रेस प्रदेश सरचिटणीस,भारतयात्री डॉ.श्रावण रॅपनवाड यांना बेंगलोर येथील गांधी भवनात "बोवि लीजेंड" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
डॉ श्रावण रॅपनवाड यांचे सामाजिक कार्य पाहून बेंगलोर येथील संस्थेने शिव रुद्रय्या स्वामी यांच्या नेतृत्वात त्यांची या पुरस्कारासाठी निवड करून तसे कळवले आहे. येत्या शनिवारी (७ डिसेंबर) रोजी सदर सन्मान बेंगलोर येथील गांधी भवनात प्रदान करण्यात येणार आहे. देशभरातील सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक, साहित्यिक व संशोधनात्मक क्षेत्रात 25 वर्षापासून कार्य करणाऱ्या निवडक प्रतिनिधींना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वडारपुत्र डॉ. श्रावण रॅपनवाड यांना आतापर्यंत बेंगलुरु, हैदराबाद, पुणे, जयपुर, दिल्ली, मुंबई आदी शहरात विविध विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
रॅपनवाड या पुरस्काराबद्दल राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

