shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मनोहर जोशी यांच्या 'या' भेटीने 'ते' वादळ शमले... उमेश काशीकर यांचे मनोगत !!



जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

राज्यपाल नियुक्ती संदर्भात एक संकेत पाळला जातो; तो म्हणजे राज्यपाल पदावरील व्यक्ती नियुक्ती होणार असेल त्या राज्यातील असू नये. 

राज्यपाल पद संविधानिक आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने पदावर असेपर्यंत पक्षीय राजकारणापासून अलिप्त राहावे अशी अपेक्षा घटनाकारांची असावी, असे दिसते.

एक आणखी संकेत पाळल्या जायचा तो म्हणजे राज्यपाल पदावरील व्यक्ती अगदी लगतच्या शेजारील राज्यातून देखील असू नये. 

याचे कारण दोन राज्यांमध्ये सीमा असते. सीमा आली की सीमावाद देखील असण्याची शक्यता असते. कालांतराने दुसरा संकेत काहीसा धूसर झाला. 

महाराष्ट्राला आतापर्यंत लाभलेल्या राज्यपालांचे गृह राज्य पहिले तर उपरोक्त संकेत बहुतांशी पाळल्याचे दिसून येते. 

*महाराष्ट्राचे राज्यपाल आणि त्यांचे गृह राज्य*
 
१. श्री प्रकाश (मूळ राज्य : उत्तर प्रदेश) (१९६०-१९६२)
२. डॉ पी सुब्बरायण (मातृ राज्य : तामिळनाडू) (एप्रिल १९६२- ऑक्टोबर १९६२)
३. विजयालक्ष्मी पंडित (उत्तर प्रदेश) (१९६२ -  ऑक्टोबर १९६४)
४. डॉ पी व्ही चेरियन (तामिळनाडू) ( १९६४ - १९६९)
५. नवाब आलियावर जंग (आंध्र प्रदेश) (१९७० -१९७६)
६. सादिक अली (राजस्थान) (१९७७ - १९८०) 
७. एअर चीफ मार्शल ओ पी मेहरा (दिल्ली) (नोव्हेंबर १९८० -  मार्च १९८२)
८. एअर चीफ मार्शल इद्रिस हसन लतीफ (आंध्र प्रदेश) (मार्च १९८२ - एप्रिल १९८५)
९. कोणा प्रभाकर राव (आंध्र प्रदेश) (मे १९८५ - एप्रिल १९८६)
१०. डॉ शंकर दयाळ शर्मा (मध्य प्रदेश) (एप्रिल १९८६ - सप्टेंबर १९८७) 
११. कासू ब्रह्मानंद रेड्डी (आंध्र प्रदेश) (१९८८- १९९०) (फेब्रुवारी १९८८ - जानेवारी १९९०)
१२. सी सुब्रमण्यम (तामिळनाडू) (फेब्रुवारी १९९० - जाने. १९९३)
१३. डॉ पी सी अलेक्झांडर (केरळ) (१९९३ - २००२)
१४. मोहम्मद फजल (उत्तर प्रदेश) (ऑक्टोबर २००२ -  डिसेंबर २००४) 
१५. एस एम कृष्णा (कर्नाटक) (डिसेंबर २००४ - मार्च २००८)
१६. एस सी जमीर (नागालँड) (जुलै २००८ - जाने २०१०)
१७. के. शंकरनारायणन (केरळ) (२०१० - २०१४)
१८. चे विद्यासागर राव (तेलंगणा) (ऑगस्ट २०१४ -  सप्टेंबर २०१९)
१९. भगतसिंह कोश्यारी (उत्तराखंड) (सप्टेंबर २०१९ - फेब्रुवारी २०२३)
२०. रमेश बैस (छत्तीसगड) (फेब्रुवारी २०२३ - जुलै २०२४)
२१. सी पी राधाकृष्णन (तामिळनाडू) (३१ जुलै २०२४ - १२ सप्टेंबर २०२५)
२२. आचार्य देवव्रत (हरियाणा)   (१२ सप्टेंबर -  )

आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश जरी महाराष्ट्राला लागून असले तरीही त्यांचे आणि महाराष्ट्राचे सीमा प्रश्न नाहीत किंवा असले तरीही तीव्र स्वरूपाचे नाही. 

परंतु  नोव्हेंबर २००४ मध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्ती जाहीर झाली आणि उभय राज्यांमधील सीमा प्रश्नावर चर्चा सुरु झाली.

कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये सीमा विवाद आणि पाणी प्रश्न प्रलंबित असल्यामुळे कृष्णा यांच्या नियुक्तीच्या वेळी राजकीय वर्तुळात त्यांच्या नियुक्तीविरुद्ध निषेधाचे सूर उमटले होते. 

दिनांक ६ डिसेंबर २००४ रोजी शपथ घेण्यासाठी एस एम कृष्णा यांचे मुंबई येथे आधल्याच रात्री (म्हणजे दिनांक ५ डिसेंबर रोजी) आगमन झाले. 

कृष्णा हे राजभवनातील 'जल लक्षण' या अतिथीगृहात आल्यानंतर लगेचच माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी त्यांना भेटण्यास आले. 

ही भेट इतकी सौहार्दपूर्ण वातावरणात झाली की कृष्णा येण्यापूर्वीचा वृत्तपत्रांमधून निघत असलेला निषेधाचा सूर पूर्णपणे बदलला. 

कृष्णा यांनी देखील आपण महाराष्ट्राचे प्रथम नागरिक असेपर्यंत महाराष्ट्राची भूमिका हीच आपली भूमिका असेल असे स्पष्ट केले.    

एस एम कृष्णा यांनी शपथग्रहणाच्या दिवशी हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले आणि पदावर असेपर्यंत ते दिलेल्या शब्दाशी कायम राहिले.  

मनोहर जोशी आणि एस एम कृष्णा यांच्या फोटोला आज २१ वर्षे पूर्ण झाली.
close