shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिवळ्या रंगाच्या रंगात न्हाऊन निघाले* : *एल.जी. बनसुडे विद्यालयाचे* *बालविश्व*

*पिवळ्या रंगाच्या रंगात न्हाऊन निघाले* : *एल.जी. बनसुडे विद्यालयाचे* *बालविश्व* 
इंदापूर: पळसदेव (ता. इंदापूर) येथील एल.जी. बनसुडे विद्यालय मध्ये प्री-प्रायमरी विभागातील छोट्या चिमुकल्यांचा “येल्लो डे” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पिवळा रंग हा आनंद, प्रकाश, सकारात्मकता आणि उत्साहाचे प्रतीक असल्याने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती व सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला, अशी माहिती विभाग प्रमुख ज्योती मारकड यांनी दिली.
इयत्ता नर्सरी ते सिनियर केजीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध पिवळ्या रंगाशी संबंधित वेशभूषा सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आंबा, मका, पतंग, सूर्यफूल, बस, पपई, फुलपाखरू, फ्रेंच फ्राईज अशा आकर्षक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या खाऊच्या डब्यात पिवळ्या रंगाचा पदार्थ आणून दिवस अधिक रंगतदार केला. संपूर्ण परिसरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हनुमंत बनसुडे, सचिव नितीन बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, उपमुख्याध्यापिका सुवर्णा वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख तनुजा फुगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्री-प्रायमरी विभागातील स्नेहल सुतार, शुभांगी मराडे, करिष्मा शेख, लता खारतोडे, सोनाली साळवे आणि सोनाली लावंड यांनी विशेष परिश्रम घेतले. पालक वर्गातूनही या उपक्रमाचे मनापासून कौतुक करण्यात आले.
close