shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इंदापूर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा*

*कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इंदापूर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा* 
इंदापूर :दि .28 फेब्रुवारी2026 रोजी महाविद्यालयामध्ये IQAC department यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या उद्देशाने Science Research Project Presentation Competition हि स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये सर्व विभागातील 222 विद्यार्थांनी 114 रिसर्च प्रोजेक्ट्सचे सादरीकरण केले. महाविद्यालयातील 700 विद्यार्थांनी या स्पर्धेचा लाभ घेतला.प्रत्येक शाखेमधून उत्कृष्ट तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली. सर्व सहभागी विद्यार्थांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, उपप्राचार्य प्रा.गोळे सर, IQAC समन्वयक डॉ. शिवाजी वीर, कलाशाखा प्रमुख डॉ.भरत भुजबळ,ARC डॉ .राजेंद्र भोसले, NAAC समन्वयक डॉ. सुरेंद्र शिंदे व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
 या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, IQAC समन्वयक डॉ. शिवाजी वीर यांनी विद्यार्थांना राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धेमध्ये प्रा. विरेश होळकुंदे, डॉ.आत्माराम फलफले, प्रा. योगेश झगडे, प्रा. दिनेश जगताप, प्राध्यापिका दिव्या जाधव, प्राध्यापिका राऊत मॅडम, डॉ. तानाजी कसबे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. हि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रा.सचिन खरात, प्रा. दिनेश जगताप, प्रा. आकिन कांबळे, प्रा. सद्दाम पटेल , प्रा.दर्शन दळवी, डॉ.महम्मद मुलानी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन खरात व आभार प्रा.दिनेश जगताप यांनी केले.
close