shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रणसिंग महाविद्यालयाची कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग परिसंवाद संपन्न

रणसिंग महाविद्यालयाची कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग परिसंवाद संपन्न
इंदापूर: इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग  महाविद्यालय कळंब-वालचंदनगर ता. इंदापूर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत “कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग” या विषयावर  एक दिवसीय राज्यस्तरीय परिसंवाद बारामती येथे संपन्न झाला.परिसंवादांचे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्था विश्वस्त राही रणसिंग,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे,उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग,उपप्राचार्य डॉ.प्रशांत शिंदे,डॉ सचिन गाडेकर,डॉ.राजकुमार गाडेकर उपस्थित होते.सचिव विरसिंह रणसिंग यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग  शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते प्रा. राहुल शहा यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मूलभूत संकल्पनांवर मार्गदर्शन केले.सत्राचे अध्यक्ष   मुधोजी महाविद्यालय फलटण चे प्राचार्य डॉ.पंढरीनाथ कदम होते.दुसऱ्या सत्रात डॉ.प्रदीप पैठणे यांनी औद्योगिक व संशोधन क्षेत्रातील AI च्या उपयोगावर माहिती दिली. सत्राचे अध्यक्ष  विद्या प्रतिष्ठान बारामती संगणक विज्ञान विभाग प्रमुख प्रा.किशोर ढाणे होते.तिसऱ्या सत्रात प्रमुख वक्ते डॉ. राहुल चक्रे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संशोधन या विषयावर मार्गदर्शन केले. सत्राचे अध्यक्ष तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती चे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप होते.संस्था विश्वस्त राही रणसिंग यांनी शैक्षणिक व संशोधनाभिमुख उपक्रमांचे उच्च शिक्षणातील महत्त्व सांगितले.प्राचार्य डॉ. अशोक काळंगे,डॉ.सुहास भैरट आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.  परिसंवादात महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमधून १२५  प्राध्यापकांनी सहभाग घेतला.प्राध्यापकांनी ७२ संशोधन लेख सादर केले.सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
close