shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा शैक्षणिक संकुलातील सर्व विभागाच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरा साजरा.

श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा शैक्षणिक संकुलातील सर्व विभागाच्या वतीने  हर्षवर्धन पाटील  यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरा  साजरा.
इंदापूर - बावडा : श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा शैक्षणिक संकुलातील श्री शिवाजी पूर्व प्राथमिक विद्यालय, श्री शिवाजी प्राथमिक विद्यालय,कै शहाजीराव पाटील प्राथमिक आश्रमशाळा,श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय ( कला, विज्ञान व वाणिज्य ) कै शहाजीराव पाटील कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालय  या सर्व विभागा च्या वतीने ( २१ ऑगस्ट ) राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तसेच संस्थेचे अध्यक्ष  हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून तसेच आज वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांच्या समवेत मान्यवरांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.
     हर्षवर्धन पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिरात  २११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच मोफत नेत्र चिकित्सा तपासणी शिबिर मध्ये 250 जणांनी तपासणी करून 120 जणांना चष्मे वाटप करण्यात आले व 35 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी झाली आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही केले.
शैक्षणिक संकुलात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्या स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
वाढदिवसानिमित्त  200 विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शूज, स्पोर्ट ड्रेस  व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. 115 विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र व शालेय साहित्य बक्षीस स्वरूपात देण्यात आले. संस्थेचे संचालक संजय घोगरे व अजित करळे यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप यावेळी करण्यात आले.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव उदयसिंह  पाटील  यांनी केले संस्थेचे उपाध्यक्ष  मनोज  पाटील,  डॉ.लक्ष्मण आसबे .  कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक घोगरे , सुरेश शिंदे यांनी आपल्या  मनोगतात हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 
       

 रक्तपेढीचे  धीरज घोगरे बुधरानी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी, 
  किरण पाटील,  सुधीर पाटील,  दादासाहेब घोगरे ,राजेंद्र देवकर,
गायकवाड सर, रामचंद्र नाईक, पवनराजे घोगरे ,  राजेंद्र सूर्यवंशी,प्रसाद पाटील,  स्वप्निल घोगरे,  संजय घोगरे, नितीन शिंदे,सरपंच सौ.पल्लवीताई गिरमे, उपसरपंच  रणजीत घोगरे,  रणजीत गिरमें,  हरिभाऊ बागल,  नामदेव घोगरे, तुकाराम घोगरे ज्ञानदेव बागल,  अशोक मगर  सुरेश शिंदे ,  अमोल घोगरे , शितलचंद्र कांबळे , लक्ष्मण घोगरे , खाडे सर ,शंकर घोगरे , राजेंद्र घोगरे , महादेव शिंदे , दीपक घोगरे,  हरिभाऊ घोगरे,  नाना कांबळे,  प्राचार्य  घोगरे डी आर ,उपप्राचार्य  लोहकरे सर, पर्यवेक्षक  कदम सर, पर्यवेक्षक  घोगरे पी.ए. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य  विराज मोहिते , रत्नप्रभादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य  लहुजी वावरे , आश्रम शाळेचे मुख्याध्यापक  घोगरे एस.डी. , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक  विनायक गुरव ,विविध संस्थांचे पदाधिकारी व सहकारी ग्रामस्थ-पालक, 
 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी गोड शिरा सर्वांना देण्यात आला .या कार्यक्रमाचे आभार  पवनराजे घोगरे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुलाणी एस.टी.सर यांनी केले.
-----------------------------
फोटो ओळ: श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा शैक्षणिक संकुलातील सर्व विभागाच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस शैक्षणिक संकुलातील आज वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.


close