निरा भिमा कारखान्यावरती हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रम व कार्यक्रमांनी साजरा
इंदापूर : प्रतिनिधी दि.21/8/26
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम व उपक्रमांनी उत्साहाने शुक्रवारी (दि. 21) साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 163 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.
कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कारखान्यावरील भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये वाढदिवसाच्या सोहळ्याप्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये अश्विनी गणेश कदम या ऊस उत्पादक महिलेने बेंबळे ता.माढा येथून येऊन रक्तदान केले. तसेच आरोग्य शिबिरामध्ये हिमोग्लोबीन, लिपीड प्रोफाईल तपासणी, एक्स रे, ई.सी.जी., ओ.पी.डी. आदी तपासण्या करण्यात आल्या. तसेच कर्मचारी वर्गास व उपस्थितांना केशर आंब्याच्या 563 रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
प्रारंभी स्वागतपर प्रास्ताविकामध्ये कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी सांगितले की, कारखान्याचे अध्यक्षा भाग्यश्री पाटील व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवस संचालक मंडळाच्या वतीने केक कापून साजरा करण्यात आला.
या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी संचालक उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, सोहळ्याचे अध्यक्ष अँड.कृष्णाजी यादव यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, अनिल बोंद्रे, रामचंद्र नाईक, शिवाजी हांगे, निवृत्ती शिंदे, दत्तात्रय पोळ, चंद्रकांत भोसले, किरण पाटील, महावीर गांधी, नानासाहेब देवकर, मोहन गुळवे, श्रीनिवास कोरटकर, के. एस. खाडे, युवराज रणमोडे, माणिक खाडे, संतोष साखरे, संतोष जगताप, रक्तपेढीचे धीरज पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी तर आभार कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी मानले.
__________________________
फोटो:-शहाजीनगर येथे नीरा भीमा कारखान्यावरती हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रम व कार्यक्रमाने संपन्न झाला.

