shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विचारांचा वारसा जपत सामाजिक कार्याची वाटचाल : सचिव वीरसिंह रणसिंग

विचारांचा वारसा जपत सामाजिक कार्याची वाटचाल : सचिव वीरसिंह रणसिंग

इंदापूर - कळंब: इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वस्त कुलदीप आण्णासाहेब हेगडे यांची निमगाव केतकी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल, तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे यांची प्राध्यापकपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश कदम व सचिव वीरसिंह  रणसिंग यांच्या हस्ते त्यांचा सत्कार विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर येथे करण्यात आला.

यावेळी बोलताना सचिव वीरसिंह रणसिंग यांनी संस्थेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विश्वासराव दादा रणसिंग व सचिव स्वर्गीय आण्णासाहेब हेगडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.संस्था त्यांच्या विचारधारेवर, संस्कारांवर आणि सामाजिक कार्याच्या दिशेने वाटचाल करीत असून शिक्षणासोबतच समाजाच्या विकासासाठी योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना कुलदीप हेगडे यांनी निमगाव केतकी विविध कार्यकारी सोसायटीच्या कामकाजाची माहिती देत संस्थेचा विस्तार, सभासदांचे हित, विविध उपक्रम आणि भविष्यातील प्रगतीची दिशा स्पष्ट केली. संस्थेने दिलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी उपाध्यक्ष प्रकाश कदम, प्राचार्य डॉ.अशोक काळंगे,उपप्राचार्य डॉ प्रशांत शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून महाविद्यालयासाठी मंजूर झालेल्या बंदिस्त सभागृह भूमीपूजन शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, आर्किटेक्ट सिद्धार्थ शहा, हेमंत माने यांच्यासह प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
close