*इंदापूर महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
- रक्तदान शिबिरामध्ये एकूण 58 रक्तदात्यांनी केले रक्तदान
- 176 विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केली आरोग्य तपासणी
- शहरातून विद्यार्थ्यांनी आरोग्य संदेश देत केली सदिच्छा दौड
- रांगोळी स्पर्धेत 52 विद्यार्थिनींनी सहभागी होत साकारल्या रांगोळ्या
- मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयात विविध उपक्रम घेऊन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी 8 वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी विद्यार्थ्यांच्या सदिच्छा दौडसाठी हिरवा झेंडा दाखविला त्यानंतर विद्यार्थ्यांनी संपूर्ण शहरात आरोग्य संदेश देत दौड पूर्ण केली.
सकाळी 9 वाजता संस्थेचे संचालक तुकाराम जाधव यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले यावेळी झालेल्या कार्यक्रमांमध्ये संस्थेचे सचिव ॲड. मनोहर चौधरी यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी संस्थेचे संचालक विलासराव वाघमोडे, अशोक कोठारी यांनी मनोगत व्यक्त करीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
सकाळी 10 वाजता संस्थेचे संचालक ॲड. अशोक कोठारी यांनी आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन केले यावेळी डॉ. ऋषिकेश गार्डे, क्रिकेटचे व्यवस्थापक गोरख भोसले, डॉ. नेताजी कसबे,सुधीर नागरगोजे आणि त्यांच्या सहकारी स्टाफ यांनी आरोग्य तपासणी केली. रक्तदाब,रक्तातील साखरेच्या प्रमाणाची चाचणी, इसीजी, वजन यांच्या तपासण्या यावेळी करण्यात आल्या.
सकाळी 11 वाजता महाविद्यालयातील मुलींच्या होस्टेल समोर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
दुपारी 12 वाजता शाहीर अमर शेख सभागृहामध्ये विद्यार्थिनींनी काढलेल्या रांगोळीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेचे संचालक सुरेश मेहेर, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन रणवरे, व्हाईस चेअरमन मनोज मोरे, माजी चेअरमन अशोक शिंदे, संचालक अविनाश कोथमीरे, दादा पिसे , मच्छिंद्र शेटे, सामाजिक कार्यकर्ते सागर गानबोटे, गोरख शिंदे, संदिपान कडवळे, हनुमंत काजळे, संजय जगताप प्रा. कृष्णा ताटे, हमीद आत्तार सायरा आत्तार, ॲड. गिरीश शहा यावेळी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. शिवाजी वीर, डॉ. महादेव वाळुंज, कला शाखाप्रमुख डॉ. भरत भुजबळ, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. सदाशिव उंबरंदड,डॉ. बिभीषण महाडिक,डॉ. तानाजी कसबे,डॉ. मनीषा गायकवाड,डॉ. महंमद मुलाणी तसेच सहकार्य प्राध्यापक यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला.

