भाटनिमगावात
हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व वृक्षारोपण.
इंदापूर - बावडा: भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले . इंदापूर पंचायत समितीच्या सदस्या अर्चना अजित खबाले व अजित खबाले यांच्या पुढाकारातून गावात वृक्षारोपण तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन पंजाबराव गायकवाड, ज्येष्ठ नेते मोहन खबाले, माजी सरपंच अजित खबाले, सचिन कांबळे, ह.भ.प. संतोष मगर महाराज, माजी चेअरमन नागनाथ खबाले, मुख्याध्यापक योगीराज गाडेकर, यांच्यासह शिक्षक कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मदत मिळाली असून वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
--------------------------
फोटो ओळ: भाटनिमगाव येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

