shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निरोगी बालक, सुरक्षित बालपणचा संदेश देत आरोग्य शिबिर संपन्न

निरोगी बालक, सुरक्षित बालपणचा संदेश देत आरोग्य शिबिर संपन्न
पळसदेव : गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल, पळसदेव येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य तपासणी व टी.टी. लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये इयत्ता पहिली, चौथी व दहावीच्या विद्यार्थ्यांना शासनमान्य टी.टी. (Tetanus Toxoid) लसीकरणाचा डोस देण्यात आला.
आरोग्य हीच खरी संपत्ती असून, निरोगी शरीरातच निरोगी मनाचा विकास होतो. बालपणापासून आरोग्याची काळजी, योग्य आहार आणि वेळेवर लसीकरण केल्यास सुरक्षित व निरोगी भविष्य घडते. विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे आणि ‘निरोगी बालक, सुरक्षित बालपण’ या उद्देशाने शासनाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
टी.टी. लस ही धनुर्वात (Tetanus) या गंभीर आजारापासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जखम झाल्यानंतर धनुर्वाताचा संसर्ग होण्याचा धोका कमी करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी वेळेवर लसीकरण करणे आवश्यक आहे.
या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. प्रीती रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथक उपस्थित होते. यावेळी श्री. प्रशांत कोळी, आरोग्य सहाय्यक, सौ. अंजना पांढरे, आरोग्य सहायिका, सौ. अश्विनी लेंडे, आरोग्य सहायिका, सौ. वैष्णवी भातांब्रे, आरोग्य सेविका, श्री. अनिल काळे, आरोग्य सेवक, सौ. अश्विनी साळवे, आशा सेविका आणि सौ. सुनंदा कांबळे, आशा सेविका उपस्थित होत्या. आरोग्य पथकाने विद्यार्थ्यांची आवश्यक आरोग्य तपासणी करून टी.टी. लसीकरण केले.
या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत बनसुडे, कार्याध्यक्ष सौ. नंदाताई बनसुडे आणि सचिव श्री. सुरज बनसुडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
यावेळी संस्थेचे प्राचार्य श्री. संजय इंगोले, मुख्याध्यापिका सौ. सीमा बाराते, उपमुख्याध्यापिका सौ. सुवर्णा वाघमोडे, समन्वयक सौ. तेजस्विनी तनपुरे, विभागप्रमुख श्री. प्रवीण मदने, सौ. ज्योती मारकड, सौ. तनुजा फुगे व सौ. जयश्री लावंड यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये लसीकरण व आरोग्यविषयक जागरूकता निर्माण झाली. ‘निरोगी बालक, सुरक्षित बालपण’ या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा हा उपक्रम ठरला.
close