shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात काव्यवाचन आणि वक्तृत्व स्पर्धेचे उत्साहात आयोजन*

*कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात काव्यवाचन आणि वक्तृत्व स्पर्धेचे उत्साहात आयोजन*
​   इंदापूर:राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त  इंदापूर येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या ज्युनिअर कॉलेजच्या वतीने काव्यवाचन आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे,उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
   ​विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व वक्तृत्व कौशल्याला वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काव्यवाचन स्पर्धेत एकूण २० विद्यार्थ्यांनी आपल्या विविध भावभावना आणि विचार मांडणाऱ्या कविता सादर केल्या, तर वक्तृत्व स्पर्धेत १० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण व प्रभावी विचार मांडत सहभाग नोंदवला.
    ​या दोन्ही स्पर्धांचे परीक्षण प्रा. शरद पवार, प्रा. युवराज फाळके आणि प्रा. अमित दुबे यांनी केले. 
    विद्यार्थ्यांच्या सादरीकरणासोबतच प्राध्यापकांनीही या महोत्सवात आपला सहभाग नोंदवला. प्रा. अमोल मगर, प्रा. अमित दुबे, प्रा. बापू घोगरे, प्रा. राजीव शिरसट, प्रा. शरद पवार यांनी सुंदर काव्यवाचन करून कार्यक्रमात विशेष रंगत आणली.
   यावेळी प्रा. भारत शेंडे, प्रा.सुवर्णा जाधव,प्रा. रवींद्र साबळे ,प्रा.धन्यकुमार माने, प्रा. रवींद्र हगवणे ,प्रा.आबासो घोळवे, प्रा.भाऊसाहेब सकुंडे, प्रा. सागर गुजराती उपस्थित होते.
   ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजीव शिरसट यांनी केले.  आभार प्रा. युवराज फाळके यांनी मानले.
close