shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साई सच्चरित्र पारायण मुख्य परीक्षेत तुषार संजय महाजन यांचा तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल गौरव; भक्ती, अभ्यास अन् यशाचा त्रिवेणी संगम

श्री साई सच्चरित्र पारायण मुख्य परीक्षेत तुषार संजय महाजन यांचा तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल गौरव; भक्ती, अभ्यास अन् यशाचा त्रिवेणी संगम

नगर प्रतिनिधी : 
श्री साईबाबांच्या पावन भूमीत भक्ती, श्रद्धा आणि ज्ञानाचा सुंदर संगम घडविणाऱ्या श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा २०२६ अंतर्गत घेण्यात आलेल्या श्री साई सच्चरित्र पारायण मुख्य परीक्षेत शिर्डी येथील तुषार संजय महाजन यांनी उल्लेखनीय कामगिरी करत पुरुष गटात तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यांनी ७० पैकी ५२ गुण मिळवत हे यश संपादन केले.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पवित्र उपक्रमात भक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. यंदाचा श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा ३२ व्या वर्षात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सलग ८ दिवस दररोज ४ तास श्री साई सच्चरित्राचे भक्तिभावाने वाचन करण्यात आले. या पारायणामध्ये ५३ अध्याय आणि ९३०९ ओव्या यांचे वाचन करण्यात आले.
या आध्यात्मिक वातावरणात श्री साई सच्चरित्राचे वाचन, चिंतन आणि मनन केल्यानंतर घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत तुषार संजय महाजन यांनी मिळवलेला तृतीय क्रमांक हा त्यांच्या अभ्यास, सातत्य आणि साईभक्तीचे फलित मानले जात आहे.
या यशाबद्दल बोलताना तुषार महाजन यांनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय श्री साईबाबांच्या कृपाशीर्वादाला दिले. “हा सन्मान केवळ माझ्या मेहनतीचा नसून, श्री साईबाबांच्या कृपाशीर्वादाचा आणि त्यांच्या चरणी केलेल्या भक्तीचा प्रसाद आहे. श्री साई सच्चरित्राचे वाचन, चिंतन आणि मनन करण्याची संधी मिळाली, हेच माझ्यासाठी सर्वात मोठे भाग्य आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या यशाबद्दल त्यांनी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी, पारायण सोहळ्याचे आयोजक, नाट्य रसिक संच, शिर्डी ग्रामस्थ, गुरुजन, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सर्व साईभक्तांचे मनःपूर्वक आभार मानले. परीक्षेच्या माध्यमातून मिळालेला हा अनुभव आणि सन्मान भविष्यातही साईसेवा, भक्ती आणि साई सच्चरित्राच्या अभ्यासासाठी प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
या यशामुळे तुषार महाजन यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी साईभक्तांकडून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
close