shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रमेश वाघे यांची बिनविरोध निवड

श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रमेश वाघे यांची बिनविरोध निवड

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर; पदाधिकारी व सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन

शिर्डी प्रतिनिधी : (तुषार महाजन)

शिर्डी येथील श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., शिर्डी कर्मचारी गणेशोत्सव मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. रमेश दगडू वाघे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी गणेशोत्सव मित्र मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
अध्यक्षपदी रमेश वाघे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन श्री. विठ्ठल तुकाराम पवार, व्हा. चेअरमन श्री. पोपट भास्कर कोते, तसेच संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मंडळाच्या उपाध्यक्षपदी श्री. मिनिनाथ गुलदगड व श्री. नवनाथ डांगे, सचिवपदी श्री. राजेंद्र भास्कर खर्डे, तर खजिनदारपदी श्री. सुनील इंद्रमान चिकणे व श्री. राहुल रमेश डांगे यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यकारिणीतील सदस्य

मंडळाच्या सदस्यपदी श्री. निलेश रणशूर, श्री. शरद राऊत, श्री. जनार्दन वाकचौरे, श्री. संजय महाजन, श्री. ज्ञानेश्वर वदक, श्री. संतोष डांगे, श्री. संदीप डांगे, श्री. नवनाथ चौधरी, श्री. अनिल सोनवणे, श्री. संजय जपे, श्री. बापू मुजमुळे, श्री. नानासाहेब ठेटे, श्री. रविंद्र कोटकऱ, श्री. मंगेश कुलकर्णी, श्री. सुदाम झिंजुडे, श्री. जालिंदर उगले, श्री. निलेश रणशूर, श्री. अजित जगताप, श्री. सतीश डांगे, श्री. बाबासाहेब शेजवळ, श्री. भगवान थोरात, श्री. संतोष खाकाळे, श्री. रमेश डांगे, श्री. रविंद्र घोरपडे, श्री. किरण चव्हाण, श्री. आतिष भडांगे व श्री. दिलीप चौधरी यांचा समावेश आहे.

मार्गदर्शकांचे मार्गदर्शन

मंडळाला श्री. विठ्ठल तुकाराम पवार पा. (चेअरमन) व श्री. पोपट भास्कर कोते पा. (व्हा. चेअरमन) यांचे मार्गदर्शन लाभणार असून, सर्व संचालक मंडळ व सर्व कर्मचारी वृंद यांचे सहकार्यही मंडळाला मिळणार आहे.

विशेष सहकार्य

गणेशोत्सवाच्या विविध उपक्रमांसाठी श्री. विलास वाणी साहेब, श्री. उदय पाटील, श्री. विजय शिंदे, श्री. ठकाजी काटकर, श्री. बाबासाहेब अनर्थे, श्री. आप्पासाहेब टेकाडे, श्री. नवनाथ थोरे, श्री. बाळासाहेब काटकर, श्री. संभाजी कोते, श्री. निखिल चौधरी, श्री. नवनाथ वाघे व श्री. पाराजी वैद्य यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

श्री साई संस्थान कर्मचारी वर्गाच्या या गणेशोत्सव मित्र मंडळाच्या माध्यमातून श्री गणरायाची भक्तिभावाने आराधना, धार्मिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याने कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अध्यक्षपदी रमेश वाघे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचा गणेशोत्सव यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

रमेश वाघे यांच्या निवडीबद्दल श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी तसेच कर्मचारी वृंद यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
close