shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद*

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद*
इंदापूर: जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. 

विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा  आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे .
भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या  विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. 
फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या  चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता. 
बाजारातील उत्साह  आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
सदर कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, सचिव  हर्षवर्धन खाडे, 
मुख्य सल्लागार  प्रदीप गुरव, संस्थेचे विश्वस्त ऋषिकेश ढोले, पृथ्वीराज ढोले, 
विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य  गणेश पवार,प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सम्राट खेडकर, शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close