श्रीरामपूर : गोपाळवाडा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते आकाश भाऊ  गव्हाणे यांची सकल गोपाळ समाज (महाराष्ट्र राज्य) श्रीरामपूर तालुका युवक सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संघटनेच्या वतीने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.



सदर नियुक्तीचे पत्र संघटनेचे समन्वयक अशोक जाधव घनगावकर व सुनील भाऊ भोसले युवक अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले. गव्हाणे यांचा कार्यकाळ २०२५ ते २०२९ या कालावधीसाठी राहणार आहे.


आकाश भाऊ गव्हाणे यांनी युवकांना एकत्रित करून समाजहिताचे विविध उपक्रम, जनजागृती तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात संघटनेचे कार्य अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल गोपाळवाडा व श्रीरामपूर तालुक्यातील सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



दरम्यान, त्यांच्या नियुक्तीमुळे सकल गोपाळ समाजाच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.