राहुरी/देवळाली प्रवरा | प्रतिनिधी
वीर वडार एकता फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय दादा गोरे यांच्या नियोजित उत्तर अहिल्यानगर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आगामी आढावा बैठकीच्या नियोजनासाठी राहुरी व देवळाली प्रवरा परिसरात वडार समाज बांधवांच्या छोटेखानी बैठका घेण्यात आल्या.
दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी, गुरुवारी सकाळी ठीक १० वाजता उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची नियोजित आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी देवळाली प्रवरा नगर परिषद तसेच प्रसादनगर, राहुरी नगर परिषद परिसरात समाज बांधवांनी एकत्र येत कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा केली.
यावेळी संदीप अशोकराव कुसळकर, संपतराव गायकवाड, भरत धोत्रे, अनिल निमसे यांच्यासह वडार समाजातील कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते. विजय दादा गोरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या आढावा बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नांवर, संघटनात्मक कामकाजावर तसेच आगामी उपक्रमांच्या नियोजनावर चर्चा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अधिकाधिक समाज बांधवांनी या आढावा बैठकीस उपस्थित राहून संघटनात्मक नियोजनात सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
“जय बजरंग, जय वडार!” या घोषणेने बैठकीचा उत्साह वाढला.

