प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
बीड-लातुर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील १७२ गिवांची तहान भागवणा-या मांजरा धरणात आज १६ ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत ७९.६३ % टक्यांच्याही पुढे पाणी संचय झाला असुन धरणक्षेत्रात पाण्याचा ऐवा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ही वर्षी धरण पुर्णक्षमतेने भरले जाण्याचीआणि धरणाची दरवाजे उघडण्याची वेळ प्रशासनावर लवकरच येईल अशी आशा निर्माण झाली आहे.
यावर्षी जुन महिन्यापासूनच दमदार पावसास सुरुवात झाली असल्यामुळे मराठवाड्यात सर्वच मोठी धरणे ओसांडुन वाहत आहेत. मांजरा धरणाच्या वरच्या बाजुस नदीच्या उगमस्थानापासुन १४ बंधारे आणि लहानमोठे असे २६ तलाव निर्माण करण्यात आल्यामुळे अलिकडील कांही वर्षात मांजरा धरण भरण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
अशाही परिस्थितीत "मांजरा" तग धरुन उभे राहण्याचा प्रयत्न करतेयच! अलिकडे पर्जन्यमानात झालेली कमी आणि मोठ्या पुढा-यांची पाणी ओढण्यासाठी निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा बीड-लातुर आणि धाराशिव जिल्ह्यातील १७२ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या या गावातील माणसांची, जनावरांची, पक्षांची, पिकांची तहाण भागवणारा मांजरा प्रकल्प भरल्यामुळे सर्वञ आनंद पसरला आहे.
आज १६ आँगस्ट २०२५ रोजी मांजरा धरणात ७९.६३ टक्यापेक्षा ही जास्त पाणी साठा जमा झाला आहे. सध्या चार-पाच दिवस सतत पावूस सांगितला असल्याने या नक्षत्रात चांगला पावूस पडतो आहे.
शिवाय कमी दाबाचा निर्माण झालेल्या पट्ट्यामुळे आपल्या भागात या चार दिवसांत सांगितलेल्या मोठ्या पावसाचा आपल्याला लाभ होणार अशी चिन्हे अधिक आहेत.
याशिवाय नेहमी तारणारा परतीचा पावूस ही अजून शिल्लक आहेच. या सर्व बाबींचा सकारात्मक विचार केला तर येत्या काही दिवसात मांजरा धरण भरल्याची व धरणाचे दरवाजे उघडल्याची गोड बातमी आपणास ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.
मांजरा धरणाची संपुर्ण पाणी साठवण क्षमता २२४.०८३ दलघमी एवढी असून आज धरणात १८८.०४६ दलघमी पाणी साठा जमा झाला आहे. म्हणजे धरण पुर्णक्षमतेने भरण्यासाठी अगदी थोड्या दलघमी पाणी साठ्याची आवश्यकता आहे. आज मांजरा नदीचा प्रवाह लक्षात घेतला तर प्रति सेकंदास ४८८.४० घनमीटर एवढे पाणी धरणक्षेत्रात जमा होत आहे. धरणक्षेत्राच्या कँचमेंट एरीयात आणखी जोराचा पावूस झाला तर हे प्रमाण वाढु ही शकेल. मांजरा नदीची क्षमता प्रति सेकंदास १०२.११९ घनमीटर एवढे पाणी धरणात आणण्याची आहे. त्यामुळे आजची परिस्थिती लक्षात घेतली तर धरण भरण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण येईल असे वाटत नाही.
▪️ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा
जिल्हाधिका-यांनी दिला इशारा
मांजरा धरण प्रवण क्षेत्रात गेली चार दिवसांपासून सतत पडत असणारा पावूस, धरण क्षेत्रात साठलेला पाणीसाठा आणि आगामी चार दिवसांत पडणा-या पावसाचा दिलेला इषारा लक्षात घेता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजी नगर विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी लातुर पाटबंधारे विभाग क्र. १ यांना सुचेना देवून १५ ऑगस्ट २०२५ रोजी एक कार्यालयीन आदेश काढून नदीकाठच्या गावांना व नदीकाठी राहणा-या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
केज मतदारसंघाच्या आ.नमिता अक्षय मुंदडा, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी मांजरा प्रकल्प ओसंडून वाहत असल्यामुळे व केज, अंबेजोगाई शहरातील पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे.
▪️माजरा प्रकल्प आजची स्थिती
दिनांक: १६ आँगस्ट २०२५
१) प्रकल्पीय पूर्ण जलाशय पातळी (FRL)
६४२.३७ मी
२) प्रकल्पीय पूर्ण पाणी साठा (G S.) १८८.०४६0/२२४.०९३ दलघमी
३) प्रकल्पीय उपयुक्त पाणी साठा (L.S.)
१४०.९१६/१७६.९६३ दलघमी
४) प्रकल्पीय मृत साठा (D.S.) ४७.१३०/४७.१३० दलघमी
५) आजची पाणीपातळी (W.L.) ६४५०/६४२.३७ मी ( सकाळी ६:००वाजता)
६) आजचा एकूण पाणीसाठा (G S.) १८८.०४६/२२४.०९३ दलघमी
७) आजचा उपयुक्त पाणीसाठा (L.D.)
७९.६३ टक्के
८) उपयुक्त पाणी साठा १७६.९६ दलघमी
९) धरणात येणारा पाण्याचा प्रवाह
(T. Inflow) १५.८२४/१०२.११९ घनमिटर प्रती सेकंद .