पतंजली परिवाराचा रक्षाबंधन हा स्तुत्य उपक्रम
इंदापूर: पतंजली योग परिवार व महिला पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व पारंपारिक उत्सव दिमाखदार पद्धतीने साजरे केले जातात, अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भाग्य लागतं असे गौरवउद्दगार सौ अंकिताताई शहा यांनी काढले.
रक्षाबंधनाचा औचित्य साधून मागील दहा वर्षापासून स्थायी वर्गामध्ये विशेषता महिला भगिनी सर्व धर्मीय समभावाची भावना मनात जपून उपस्थित पुरुष बांधवांना राखी बांधून निरोगी आयुष्यासाठी मनोकामना करतात. या कार्यक्रमासाठी इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष सौ अंकिताताई शहा त्याचबरोबर शहा ग्लोबल स्कुलचे विश्वस्त श्री मुकुंद शेठ शहा आवर्जून उपस्थित होते. यावेळी उपस्थित भगिनींना योगाचे मॅट गिफ्ट देण्यात आले. रक्षाबंधनाच्या सणानिमित्त महिला ह्या सर्व बंधूंच्या घरी जातात, परंतु पतंजली परिवारातील महिला भगिनी या आवर्जून या उत्सवासाठी थांबतात व वर्गातील रक्षाबंधन झाल्यानंतरच आपापल्या गावी रवाना होतात.
पतंजली परिवारातील प्रत्येक पारंपारिक कार्यक्रमाचा इंदापूर शहरातील नागरिक आदर्श घेतात असे श्री मुकुंद शेठ शहा म्हणाले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व महिला भगिनींनी एकत्रितपणे कष्ट घेतले. योग रत्न श्री दत्तात्रय अनपट व कालठन गलांडवाडी येथील सर्व पुरुष बांधव उपस्थित होते