shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोलमध्ये ५५५५ वृक्षारोपणाचा हरित संकल्प — आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते अभियानाची सुरुवात.


हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत वसुंधरा संवर्धनाची शपथ; शहरभर रॅलीसह वृक्षारोपण.

एरंडोल — राज्यातील वनाच्छादनाचे प्रमाण वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत यंदा १० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार एरंडोल नगरपरिषदेच्या वतीने शहरात ५५५५ वृक्ष लागवडीचा शुभारंभ आमदार अमोल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी मनीष गायकवाड, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील, धरणगाव बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, गटविकास अधिकारी दादाजी जाधव, माजी नगरसेविका छायाताई दाभाडे, माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन, माजी उपनगराध्यक्ष जाहिरोद्दीन शेख कासम, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, माजी सैनिक कृष्णा महाजन, ईश्वर बिऱ्हाडे, अमित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

आमदार पाटील यांनी वृक्षारोपण हे लोकचळवळीत परिवर्तित करण्याचे आवाहन केले. उपस्थितांनी वसुंधरा संवर्धनाची व वृक्षलागवडीची शपथ घेतली. वृक्षरोपणासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुस्लिम समाजातील कब्रस्तान पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. भवानी नगर, लांडापूर, पद्मालय रस्ता या भागात वसुंधरा रॅलीसह वृक्षारोपण झाले.

रॅलीची सुरुवात रा.ती. काबरे विद्यालयाच्या पटांगणावरून झाली. यावेळी प्राचार्य ए.जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, प्रा. नरेंद्र गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी बळवंत पाटील, माजी सैनिक कृष्णा महाजन, चिंतामण पाटील, अमोल तांबोळी, गुड्डू जोहरी, आर.डी. पाटील यांच्यासह शहरातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले, सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक हितेश जोगी यांनी केले तर आभार एस.आर. ठाकूर यांनी मानले.


close