इंदापूर : दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.गिरीश रणछोडदास शहा यांच्या मार्फत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने 15 ऑगस्ट निमित्त मोफत गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वृक्षमित्र चंद्रकांत देवकर (नाना) हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ. सायरा आत्तार व हमीद आत्तार उपस्थित होते . पंचायत समितीचे माजी विस्तार अधिकारी पुष्पराज जमदाडे , तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष .हुसेन मुलानी, ॲड. ओमकार गिरीश शहा, अशोक अनपट नाना, शहाजहान अमीर शेख, वसीम शब्बीर शेख, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शालेय परिसरातील पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
15 ऑगस्ट च्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळावा या हेतूने शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने गणवेश वितरण करण्यात आले.
यावेळी ॲड. भगवानराव खारतोडे यांच्यावतीने मुलांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी RO वॉटर प्युरिफायर देण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत देवकर नाना यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या संत तुकाराम महाराज यांच्या वृक्ष वरील प्रेमाचे महत्त्व समजून सांगितले. वृक्ष तसेच मुले आपल्या सर्वांना आवडतात. त्यांना आपण प्रेमाने जपले पाहिजे असे सांगितले. यावेळी सौ. सायरा हमीद अत्तार यांनी आर. के. काका यांच्या जुन्या आठवणी मुलांना सांगितल्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश शहा यांनी मुलांना आणि पालकांना मुलांनी शाळेत शिक्षण घ्यावे आणि खूप मोठे व्हावे असे मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.