शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
राजकीय बातमी
सोनई - महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब व कार्यक्षम प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण साहेब तसेच पालकमंत्री नामदार राधाकृष्ण जी विखे पाटील यांच्या आदेशानुसार भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी नेवासा दक्षिण विभाग मंडल कार्यकारणी घोषित करण्यात आली. सोनई मंडल आध्यक्ष श्री संभाजी जगताप पाटील यांच्या अधिपत्याखाली ही निवड करण्यात आली
भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्षपदी श्री. विशाल बापूराव धनगर यांची नियुक्ती करण्यात आली विशाल भाऊ धनगर हे पंधरा वर्षांपासून भारतीय जनता पार्टी चे काम करत आहेत, पानसवाडी मध्ये बुथवर काम करताना लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होताना शासकीय योजना जन सामान्यमानसापर्यंत पोहोचवण्याचे काम ते करत असतात विशाल भाऊ धनगर म्हणाले की देशामध्ये भाजपा हा पक्ष सर्वश्रेष्ठ व मोठा मानला जातो तसेच नेवासा तालुक्यात संघटना मजबूत करून येणाऱ्या काळात जिल्हा परिषद ,पंचायत समिती , व इतर निवडणुका असतील त्या सर्वतोपरी जागा जिंकून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे विशाल भाऊ धनगर यांनी सांगितले.
निवडीबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण साहेब ,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील , पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकरजी शिंदे साहेब , आ.विठ्ठलरावजी लंघे पाटील , आ.शिवाजीराव कर्डिले साहेब , भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर , मंडलाध्यक्ष संभाजी राजे जगताप , सभापती रामजी शिंदे साहेब यांचे सहाय्यक मनोज भाऊ कोकाटे , नगर उत्तर जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग साहेब , आदर्श गाव वाघोली चे सरपंच उमेश भाऊ भालसिंग , ऋषिकेश जी शेटे पाटील , तालुका अध्यक्ष प्रताप भाऊ चिंधे , सचिन भाऊ देसरडा, कुणाल भाऊ बोरूडे , सचिन जी भांड , ललित भाऊ मोटे (सरपंच, वडाळा), भाजपा राहुरी तालुका उपाध्यक्ष योगेश भाऊ बानकर, अरुण भाऊ चांदघोडे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भाऊ शिंदे, नामदेव भाऊ येळवंडे, अंबादास उंदरे पाटील , नेवासा तालुका शहर आध्यक्ष मनोज भाऊ पारखे, नेवासा तालुका भाजपा प्रसिद्धीप्रमुख आदिनाथ पटारे आदींनी अभिनंदन केले.