shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तुळजाराम चतूरचंद महाविद्यालय बारामती व विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब यांच्यामध्ये सामंजस्य करार

तुळजाराम चतूरचंद महाविद्यालय बारामती व विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब यांच्यामध्ये सामंजस्य करार
इंदापूर :इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर व बारामती येथील तुळजाराम चतूरचंद महाविद्यालय  यांच्यामध्ये इंग्रजी विभागांतर्गत शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास अनुसरून असणाऱ्या उद्देशपूर्तीकरिता सामंजस्य करार महत्वपूर्ण ठरणार आहे. करारानुसार अध्यापन, अध्यापन सहाय्य, संशोधन कार्य, तंत्रज्ञान, जीवन कौशल्ये आणि मूल्ये विकास, करिअर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्यामध्ये नवीन क्षमता निर्माण, कौशल्य वाढ, व्यक्तिमत्व विकास, अनुवाद, प्रूफरीडिंग, सेमिनार, कार्यशाळा, वेबिनार इत्यादींद्वारे ज्ञानाची देवाणघेवाण असे विविध उपक्रम राबवणे व विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे अशा विद्यार्थी विकासाच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.
करार प्रसंगी इंदापूर तालूका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग, टी.सी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, रणसिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांचे मार्गदर्शन या करिता महत्वपूर्ण ठरले.  उपप्राचार्य डॉ. सचिन गाडेकर, उपप्राचार्य योगिनी मुळे, डॉ. अजित तेलवे, डॉ. अरुण मगर, रजिस्ट्रार श्री अभिनंदन शहा, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. अजय ढवळे, डॉ. सुशील देशमुख, डॉ. सुहास राऊत, डॉ. गोरे, डॉ. शेळके टी सी महाविद्यालय व  रणसिंग  महाविद्यालयातर्फे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. विलास बुवा, डॉ. प्रशांत शिंदे. डॉ. सुहास भैरट उपस्थित होते.
अनेकांत एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष जवाहर शहा, सचिव मिलिंद शहा वाघोलीकर , इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान अध्यक्ष आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश बापू कदम इ मान्यवर यांनी पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिल्या
close