श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुका भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षपदी संदीप आसने यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे यांनी श्रीरामपूर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली.
या कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस, १० चिटणीस, १ कोषाध्यक्ष, ३० कार्यकारीणी सदस्य, २४ इतर आघाड्यांसह ६९ कायम निमंत्रीत सदस्य असे एकूण १५० जणांचा समावेश करण्यात आला असून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न यावेळी तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे यांनी केला आहे.
सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहर अध्यक्ष जितेंद्र छाजेड आदिनी अभिनंदन केले.
भारतीय जनता पक्षाने सोपवलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे आणि पूर्ण निष्ठेने पार पाडून भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण हे समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपण करणार असल्याचे नूतन सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष संदीप आसने यांनी यावेळी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111