श्रीरामपूर (प्रतिनिधी ) :- हिंद सेवा मंडळाच्या क.जे. सोमैया हायस्कूल मध्ये प्रवरा मेडीकल ट्रस्ट, ग्रामीण दंत महाविदयालय व इंडियन डेंटल असो.श्रीरामपूर ब्रँच, मानद सचिव संजय जोशी, विद्यालयाचे चेअरमन रणजीत श्रीगोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन जितेंद्र अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत चिकित्सा शिबीर आयोजीत केले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुशांत सातदिवे होते. प्रमुख मान्यवर डॉ.स्नेहल पाटील, डॉ.धीरज उंबरे, डॉ.प्रणय ठाकुर, डॉ.स्वाती चव्हाण, डॉ.घोगरे, डॉ. संचेती , वैद्यकिय क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश कोळगे, मुख्याध्यापक भूषण गोपाळे होते. या प्रसंगी डॉ. स्नेहल पाटील यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी, दातांची निगा या बाबत मागदर्शन केले. इ.५ वी ते इ.१०वी च्या सर्व विद्यार्थांची दातांची तपासणी केली व मोफत औषधे दिली. मोफत दंत शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रवरा मेडीकल ट्रस्टचे सर्व स्टाफ, विनायक चितळकर, संकेत गंधे, रमेश धोंडलकर ,श्रीराम कुलकर्णी, शिवाजी सरपते सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते.