shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेणू हॉस्पिटल बीड येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस विनामूल्य सेवा उपलब्ध!!

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-    

बीड शहरातील डॉ.सुरेश मुंडे यांच्या रेणू हॉस्पिटल मध्ये (एम. एस. इ. बी . ) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड महामंडळातील कर्मचारी व अधिकारी तसेच लाईनमन यांना  रेणू फ्रॅक्चर एक्सीडेंट जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर केअर बीड मध्ये आता कॅशलेस , विनामूल्य सुविधेसाठी पूर्ण उपलब्ध झाले आहे .  महाराष्ट्रातील एम .एस. इ .बी .च्या सर्व कर्मचारी पदाधिकारी यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. रेणू हॉस्पिटलमध्ये एकही पैसा न खर्च करता अत्याधुनिक पद्धतीची उपचार करून घ्यावेत रेणू हॉस्पिटल ची अत्याधुनिक पद्धतीची सेवा घ्यावी असे आवाहन रेणू हॉस्पिटलचे डॉ.सुरेश मुंडे व मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केज तालुका अध्यक्ष शिवाजी घुले यांनी कळविले आहे.



डॉ.सुरेश मुंडे प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन आहेत.त्यांच्या रेणू हॉस्पिटलमध्ये एमआरआय मशीन तसेच सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर सुरेश मुंडे यांचे नाव खूप मोठे आहे. त्यांनी कित्येक रुग्णांना उपचार करून जीवनदान दिले आहे. डॉ . सुरेश मुंडे यांनी असंख्य रुग्णावरती शस्त्रक्रिया, Operation केले आहेत व रुग्णांना पुर्ववत केले आहे.अनुभवी व तज्ञ डॉ. म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळे विद्युत विभागातील सर्व कर्मचारी वर्गाने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.सुरेश मुंडे रेणू हॉस्पिटल बीड यांनी केले आहे.

close