shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्द सन्मानित.

सरपंच वर्षा पाटील यांचा संकल्प  “आम्ही आपल्या आदेशाचे पालन करीत राहू, तसेच भविष्यात आणखी नाविन्यपूर्ण योजना राबवून तालुक्याचे नाव राज्यात व देशात उज्ज्वल करू,” असा विश्वास सरपंच सौ. वर्षा पाटील यांनी व्यक्त केला

बालिका स्नेही पंचायत उपक्रमासाठी जिल्हास्तरीय पुरस्कार.

जळगाव (प्रतिनिधी):- स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी नियोजन भवन, जळगाव येथे झालेल्या नाविन्यपूर्व कार्यक्रमात अमळनेर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्द यांना “बालिका स्नेही पंचायत” या विशेष उपक्रमासाठी जिल्हा पुरस्काराने गौरविण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार...

या सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते, तसेच खासदार स्मिता वाघ, आमदार राजू भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाड यांच्या उपस्थितीत पिंपळे खुर्द ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.

जिल्ह्यातील पाच, तालुक्यातील एक ग्रामपंचायत निवड.

जिल्ह्यातून फक्त पाच आणि अमळनेर तालुक्यातून एकमेव ग्रामपंचायत म्हणून पिंपळे खुर्दची निवड होणे हा ग्रामस्थांसाठी अभिमानाचा क्षण ठरला. बालिका स्नेही पंचायत म्हणून ग्रामपंचायतीने केलेल्या उपक्रमांची दखल घेत हा सन्मान मिळाला आहे.

नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्द सन्मानित.

सरपंच वर्षा पाटील यांचा संकल्प.

“आम्ही आपल्या आदेशाचे पालन करीत राहू, तसेच भविष्यात आणखी नाविन्यपूर्ण योजना राबवून तालुक्याचे नाव राज्यात व देशात उज्ज्वल करू,” असा विश्वास सरपंच सौ. वर्षा पाटील यांनी व्यक्त केला.

गावात भव्य स्वागत सोहळा...

पुरस्कार स्वीकृतीवेळी सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील, उपसरपंच मीना सतीश पाटील, ग्रामसेवक के.के. लंकेश शिरुड, अंगणवाडी सेविका लताताई चौधरी, निर्मलाबाई चौधरी, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, पुरुषोत्तम लोटन चौधरी, जयवंत पाटील, सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार घेऊन आल्यानंतर गावात भव्य सत्कार समारंभ झाला. कैलासवासी सुकलाल आनंदा माध्यमिक विद्यालय, पिंपळे बुद्रुक चे मुख्याध्यापक संजय भोसले व सर्व शिक्षकवृंद यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला.

close