shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"रा. ति. काबरे विद्यालयात पालक-शिक्षक, माता-पालक व सखी-सावित्री संघ सभा उत्साहात संपन्न."

एरंडोल (दि. 08 ऑगस्ट 2025) – एरंडोल येथील रा. ति. काबरे विद्यालयात पालक-शिक्षक संघ, माता-पालक संघ व सखी-सावित्री संघाची सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.  या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील शिवचरण राठी सर, पर्यवेक्षक श्री. पी. एस. नारखेडे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. आर. एम. कुलकर्णी सर, श्री. व्ही. टी. पाटील सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक श्री. जी. एम. शर्मा सर तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.  सभेचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री. सुनील शिवचरण राठी सर यांनी भूषवले. पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष म्हणून श्री. भूषण दिलीप चौधरी तर माता-पालक संघाच्या उपाध्यक्षा म्हणून सौ. मंजुळाबाई निंबा महाजन यांची पालकांच्या सहमतीने निवड करण्यात आली.  सभेचे सूत्रसंचालन श्री. आर. एम. कुलकर्णी सर यांनी केले. प्रास्ताविकेतून श्री. पी. एस. नारखेडे सर यांनी सभेची उद्दिष्टे मांडली. मागील वर्षीच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा इतिवृत्त श्री. व्ही. टी. पाटील सर यांनी सादर केला तर मागील सभेचे इतिवृत्त श्री. जी. एम. शर्मा सर यांनी वाचले. शेवटी आलेल्या सर्व पालकांचे आभार प्रदर्शन श्री. ए. बी. शर्मा सर यांनी मानले.  उपस्थित पालकांचा उत्स्फूर्त सहभाग व शिक्षकवर्गाचे सहकार्य यामुळे सभा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

 एरंडोल (दि. 08 ऑगस्ट 2025) – एरंडोल येथील रा. ति. काबरे विद्यालयात पालक-शिक्षक संघ, माता-पालक संघ व सखी-सावित्री संघाची सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील शिवचरण राठी सर, पर्यवेक्षक श्री. पी. एस. नारखेडे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. आर. एम. कुलकर्णी सर, श्री. व्ही. टी. पाटील सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक श्री. जी. एम. शर्मा सर तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

सभेचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री. सुनील शिवचरण राठी सर यांनी भूषवले. पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष म्हणून श्री. भूषण दिलीप चौधरी तर माता-पालक संघाच्या उपाध्यक्षा म्हणून सौ. मंजुळाबाई निंबा महाजन यांची पालकांच्या सहमतीने निवड करण्यात आली.

सभेचे सूत्रसंचालन श्री. आर. एम. कुलकर्णी सर यांनी केले. प्रास्ताविकेतून श्री. पी. एस. नारखेडे सर यांनी सभेची उद्दिष्टे मांडली. मागील वर्षीच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा इतिवृत्त श्री. व्ही. टी. पाटील सर यांनी सादर केला तर मागील सभेचे इतिवृत्त श्री. जी. एम. शर्मा सर यांनी वाचले. शेवटी आलेल्या सर्व पालकांचे आभार प्रदर्शन श्री. ए. बी. शर्मा सर यांनी मानले.

उपस्थित पालकांचा उत्स्फूर्त सहभाग व शिक्षकवर्गाचे सहकार्य यामुळे सभा यशस्वीरीत्या संपन्न झाली.


close