shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न.



श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न.
इंदापूर : श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संकुलामध्ये देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी शैक्षणिक संकुलातील 79 व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तसेच श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संचालक  उदयसिंह पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले व संस्थेचे उपाध्यक्ष  मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
   यावेळी विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.कु. प्रतीक्षा कवडे व चि. भूषण वाघमारे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

   स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना  संस्थेचे संचालक  उदयसिंह पाटील म्हणाले की, आज स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे पूर्ण झाली आहेत.देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले असे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू तसेच इतर अनेक थोर क्रांतिकारक नेते यांना विनम्र अभिवादन करतो. 
सध्या या शैक्षणिक संकुलामध्ये 4000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याचे सर्व श्रेय कै. कर्मयोगी भाऊ तसेच माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील  यांना जाते. संस्थेच्या वतीने नेहमीच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते.गुणवत्तेच्या बाबतीत विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले.

 संस्थेचे उपाध्यक्ष  मनोज पाटील म्हणाले की, या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा,सांस्कृतिक व शैक्षणिक गुणवत्ता याकडे लक्ष दिले जाते. जगाच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी टिकले पाहिजे अशा प्रकारचे दर्जेदार शिक्षण दिले जाते. देश सेवा महत्वाचे असल्याचे  प्रतिपादन त्यांनी केले.तसेच आपल्यावर आलेल्या संकटांचा आपण स्वतः लढा दिला पाहिजे असे ते म्हणाले. 

यावेळी क्रीडा विभागाच्या वतीने विद्यार्थी संचलनाने मानवंदना देण्यात आली.तसेच देशभक्तीपर थीम सादर करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक  प्राचार्य  घोगरे डी आर सर यांनी केले. 
   या कार्यक्रमादरम्यान कै.दत्तात्रय पाटील गुरुजी यांच्या स्मरणार्थ सौ.रेखा पाटील व श्री. सुनील पाटील यांच्या वतीने इयत्ता दहावीच्या प्रथम,द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना 5000 रुपये,3000 रुपये,2000 रुपये बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून प्राचार्य  घोगरे डी आर सर यांचाही सन्मान करण्यात आला. 

  या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव  किरण पाटील,  सुधीर पाटील, उमेश सूर्यवंशी, स्वप्निल घोगरे, प्रसाद पाटील, संजय घोगरे, संतोष सूर्यवंशी, नितीन शिंदे, सरपंच सौ पल्लवी गिरमे, उपसरपंच रणजीत घोगरे, संस्थेचे संचालक  प्रसाद पाटील,   नामदेव घोगरे,  तुकाराम घोगरे,  विठ्ठल घोगरे,  महादेव शिंदे,  दादा गिरमे, ग्रामसेविका अंबिका पावसे, मोठ्या संख्येने सर्व माजी सैनिक, उपप्राचार्य  हासे डी व्ही , कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य विराज मोहिते सर, रत्नप्रभादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य  लहू वावरे सर, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक  घोगरे एस.डी. सर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विनायक गुरव सर,मा प्राचार्य गोरे सर, सेवानिवृत्त शिक्षक, सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारी मान्यवर सदस्य तसेच बावडा पंचक्रोशीतील मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी व सहकारी ग्रामस्थ-पालक उपस्थित होते.
  यावेळी सर्व अध्यापक अध्यापिका इतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .मुलाणी एस.टी.सर यांनी केले.

close