shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौराईमळा शाळा पुणे जिल्हा अध्यक्ष चषकासाठी तालुक्यातुन पात्र ठरल्याने स्वातंत्र्य दिन विशेष सन्मान* *विविध स्पर्धा परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*


*गौराईमळा शाळा पुणे जिल्हा अध्यक्ष चषकासाठी तालुक्यातुन पात्र ठरल्याने स्वातंत्र्य दिन विशेष सन्मान*

 *विविध स्पर्धा परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
इंदापूर : दिनांक 15 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी गौराईमळा  यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभात फेरी, ध्वजारोहण ,राष्ट्रगीत ,ध्वजगीत , राज्यगीत,संविधान घेऊन तिरंगा ध्वजास मानवंदना देण्यात आली. 
          शाळेतील मंथन परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा व कला, क्रीडा महोत्सवात यशस्वी झालेल्या मुलांचा प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. इंदापुर तालुका प्रज्ञाशोध  परीक्षा व पुणे जिल्हा प्रज्ञाशोध मधील गुणवत्ता धारक सर्व मुलांचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी मुलांनी *मराठी हिंदी इंग्रजी अशा विविध भाषांमधून दर्जेदार भाषणे सादर केली.* उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
      या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व सेवा निवृत्त मुख्याध्यापक अरुण जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोलजी नाझरकर यांनी शाळेच्या प्रगती बाबतीत व वाढलेला पट हा नक्कीच अभिमान स्पद  असल्याचे सांगितले . 
      या वेळी मागील वर्षातील मुख्यमंत्री स्वच्छा शाळा सुंदर शाळा उपक्रमातील यशस्वीते प्रमाणे या शैक्षणिक वर्षातील पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष चषकासाठी इंदापुर तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला . त्या बदल ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने दोन्ही शिक्षकांचा सत्कार केला. 
         या वेळी ऑपरेशन सिंदुर या अंतर्गत मुलींनी प्रतिकात्मक गीत सादर करुन उपस्थित पालकांची मने जिंकली .या गाण्यासाठी तंटामुक्ती शेळगावचे अध्यक्ष तात्यासाहेब शिंगाडे, अरुण जाधव यांनी प्रत्येकी १००० रुपये , शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष अमोल जाधव यांनी ५०० रुपये जगन्नाथ जाधव २०० रुपये या प्रमाणे मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकुन मुलांचा आनंद व्दिगुणित केला. 
        या प्रसंगी  दिपक दादा शिंगाडे , विनोद जाधव , संजय वायसे , राजु शेख , मल्हारी जाधव , अंबादास जाधव , पद्यराज जाधव , हनुमंत सुतार , सुरेश शिंगाडे , जयसिंग जाधव , अमोल कदम , शेवंताई भोसले , मनिषा जाधव , प्रियांका नाझरकर , अनुराधा शिंगाडे , रेश्मा शेख, नाझरकर  ताई, गौरी शिरसट , उषा जाधव , अश्विनी जाधव,पूनम जाधव,अंगणवाडी सेविका सुनिता जाधव , मदतनीस कल्पना जाधव याच बरोबर  ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
          पालक ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर   यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन उपशिक्षिका जुबेदा पठाण मॅडम व सुकन्या  हिना शेख  यांनी केले.
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
close