लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयात
इंदापूर : महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी मध्ये उत्साहा मध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी ज्या विद्यार्थ्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या शुभ हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात केक कापून हर्षवर्धन पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच विद्यालयाच्या वतीने विद्यालयामधील असलेल्या होतकरू ५१ विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांमधून चि.हर्षराज सुद्रिक यांनी मनोगत व्यक्त केले. तर मान्यवरांमधून संचालक दत्तात्रेय सवासे यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी दत्तात्रेय सवासे, दयानंद गायकवाड, तुकाराम बर्गे, तुकाराम इंगवले, तानाजी इंगवले, शंकर फडतरे, संतोष गायकवाड, भारत मारकड , आजिनाथ मारकड,.राहुल हेगडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भिमराव आवरे यांनी केले. सूत्रसंचालन अमर निलाखे यांनी तर आभार राजेंद्र रणमोडे यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त केकचे वाटप करण्यात आले.