*रक्तदानाचे पुण्य कार्य नव्या पिढीने हाती घेतले आहे - हर्षवर्धन पाटील*
- हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयात रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपणाचे आयोजन
इंदापूर: इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयाच्या क्रीडा भवन या ठिकाणी इंदापूर महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे व वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना ते म्हणाले की रक्तदान सर्वश्रेष्ठ असून असे पुण्य कार्य नव्या पिढीने हाती घेतले आहे.
यावेळी अनेक मान्यवर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य ,प्रशालेचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
इंदापूर महाविद्यालयाच्या गीताचे अनावरण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' नव्या पिढीला स्वच्छ हवा मिळवून देणे त्यांना पर्यावरणीय लाभ मिळवून देणे यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे तसेच युवकांनी यावेळी रक्तदान सारखे पुण्य कार्य हाती घेतल्याचा आनंद होत आहे.
अक्षय रक्तपिढीचे धीरज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदानाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला.
यावेळी संस्थेचे संचालक विलासराव वाघमोडे, माजी उपनगराध्यक्ष प्रा. कृष्णा ताटे, माजी उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, माजी नगरसेवक शेखर पाटील, माजी नगरसेवक कैलास कदम ,मेघश्याम पाटील , मच्छिंद्र शेटे ,अविनाश कोथमीरे , मनोज मोरे ,अमोलराजे इंगळे, सागर गानबोटे, दादा पिसे, पै.दत्ता पांढरे , महादेव पांढरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे , उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे , डॉ. संदेश शहा , डॉ. शिवाजी वीर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन भोसले यांनी केले.