अहिल्यानगर: प्रतिनिधी:-
👉 मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत शिफारशींवर कार्यवाही करण्यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळाची उपसमिती पुनर्गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
👇 समितीतील सदस्य
या बारा सदस्यीय समितीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, क्रीडामंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसेच सामान्य प्रशासन विभागाचे सचिव यांचा समावेश आहे.
📌 या समितीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
००००