shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

“ज्या मातेच्या कुशीतून आम्हाला आयुष्य मिळालं, त्या मातेला समाजाकडून सन्मान – श्रीमती पूनम किशोर बिर्ला ‘आदर्श आई गौरव पुरस्काराने’ सन्मानित”.

“ज्या मातेच्या कुशीतून आम्हाला आयुष्य मिळालं, त्या मातेला समाजाकडून सन्मान – श्रीमती पूनम किशोर बिर्ला ‘आदर्श आई गौरव पुरस्काराने’ सन्मानित”.

एरंडोल
(प्रतिनिधी) –आजचा दिवस बिर्ला कुटुंबासाठी अतिशय गोड आणि अभिमानास्पद ठरला. कारण ज्या मातेच्या त्याग, ममत्व आणि संस्कारातून परिवार घडतो त्या श्रीमती पूनम किशोर बिर्ला यांना ऊर्जा सामाजिक संस्था तर्फे “आदर्श आई गौरव पुरस्कार 2025” ने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीप दादा पाटील, राष्ट्रीय मंत्री सहकार भारती यांच्या हस्ते तसेच माजी नगरसेवक श्री राजेंद्र ठाकूर यांच्या शुभहस्ते श्रीमती पूनम बिर्ला यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सन्मान प्रसंगी कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर समाजातील नागरिकांच्या चेहऱ्यावर अभिमानाची झळाळी दिसून आली.

या सोहळ्यात ज्येष्ठ वार्ताहर व व्यंगचित्रकार श्री बी. एन. चौधरी, ज्येष्ठ विधी तज्ञ ॲड. मोहन दादा शुक्ला, निवृत्त तहसीलदार श्री अरुण माळी भाऊसाहेब, माजी नगरसेवक जगदीश भाऊ ठाकूर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध कवी-लेखक प्रा. वा. ना. आंधळे, साळी समाजाचे अध्यक्ष व निवृत्त मुख्याध्यापक श्री पंडित काका साळी, ॲड. दिनकरराव पाटील, सर्वोदय ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री नामदेव काका पाटील तसेच वास्तुविषारद व नगररचनाकार श्री कल्पेश भाऊ कलंत्री यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण आधार महाजन व सचिव सौ. अंजली प्रवीण महाजन यांनी या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले. श्रीमती बिर्ला यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या मातृत्वाची आणि सामाजिक योगदानाची समाजमान्य पावती असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

close