प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी;-
महाराष्ट्रात संततधर पाऊस सुरू असताना आमदार नमिता ताई मुंदडा केज मतदारसंघातील मेंढपाळाच्या भेटीला धावून गेल्या तसेच मेंढ्यांची व मेंढपाळ्यांच्या कुटुंबांची आस्तेवायिकपणे चौकशी करून औषध वाटप करून स्वतःची व मेंढ्यांची काळजी घेण्याची विनंती केज मतदारसंघातील मेंढपाळांना केली.
महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये सततचा पाऊस चालू असल्यामुळे बीड जिल्ह्यातील मेंढपाळांच्या मेंढ्यांना साथ रोगांचे आजार होऊ लागल्यामुळे केज मतदार संघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा यांनी महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाला तातडीच्या सूचना देऊन मेंढ्यांना रोग प्रतिबंधक लस उपलब्ध करून मेंढपाळांना वाटपाचा शुभारंभ मेंढ्यांना लसीचा डोस पाजून आमदार सौ नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते संपन्न झाला . यावेळी या कार्यक्रमाचे नियोजन कुंबेफळ येथील प्रकाश जाडकर व मेंढपाळ बांधव यांनी केले .यावेळी चंदनसावरगाव पशुधन पर्यवेक्षक डॉ अनिकेत काटुळे, केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ वसुदेव नेहकर, केज भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार, तालुकाअध्यक्ष भाजप ओबीसी मोर्चा प्रकाश जाडकर , सुरेश नांदे सर ,गोपाळ मस्के ,विष्णू (आबा) थोरात ,उपसरपंच कुंबेफळ रामकृष्ण भंडारे, संदीप थोरात व परिसरातील मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.