जळगाव – स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडक कारवाई करत औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या चोरीचा पर्दाफाश केला आहे.
१५ ऑगस्ट रोजी एम.आय.डी.सी. परिसरातील स्पेक्ट्रम इंडस्ट्रिज या कंपनीतून तब्बल ४० हजार रुपये किंमतीचे कॉपर पट्टे चोरीस गेले होते. याबाबत कंपनीचे मॅनेजर बाळु गोवर्धन पाटील यांच्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🔎 तपासात कंपनीतच काम करणारे –
१) ओम रामेश्वर पोपटकर (वय-२०, रा. वाघनगर)
२) रोहित उर्फ रोहन भिकन मराठे (वय-२२, रा. कासमवाडी)
३) सागर धर्मेंद्र सपकाळे (वय-१९, रा. वाघनगर)
हे तिघे आरोपी सहभागी असल्याचे उघड झाले.
गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी एम.आय.डी.सी. पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पो.उपनि. शरद बागल, सफौ. अतुल वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, प्रविण भालेराव, किशोर पाटील, राहुल रगडे, उदय कापडणे, मुरलीधर धनगर, सिद्धेश्वर डापकर यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
न्यायालयाने आरोपींना ३ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली असून पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस करीत आहेत. आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या चोरीत सहभाग घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे औद्योगिक क्षेत्रातील मोठी चोरी उघडकीस आली असून कायदा व सुव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे.