*माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाने घेतले विविध उपक्रम*
इंदापूर: इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री तसेच संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
दोन दिवशीय कार्यक्रमामध्ये दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी विविध कलागुणदर्शनपर कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. यामध्ये पोवाडागायन, गीत गायन, कविता वाचन, मिमिक्री, मेहंदी, नृत्य व प्रबोधनपर किर्तन इ. कलाप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले.
दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी रांगोळी व विविध प्रकारच्या कला व मनोरंजन पर खेळ विद्यार्थ्यांनी सादर केले.
मोठ्या संख्येने विद्यार्थी सदर कला प्रकारात सहभागी झाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे,उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजाराम गावडे यांनी केले.
आभार प्रा. सचिन आरडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कला शाखाप्रमुख डॉ. भरत भुजबळ, विज्ञान शाखा प्रमुख डॉ. शिवाजी वीर, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. सदाशिव उंबरदंड , डॉ. गजानन ढोबळे, डॉ. मृदुल कांबळे, डॉ. मनीषा गायकवाड, प्रा. प्रकाश करे , प्रा. शिवाजी राजगुरू, प्रा. मुक्ता लाळगे, डॉ. तानाजी कसबे व इतर प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.