शिर्डी येथे रस्सीखेच राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांचे भव्य उद्घाटन संपन्न..
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
शिर्डी – संत साईबाबांच्या पावन भूमीत आज शनिवारी दुपारी ४:०० वाजता राष्ट्रीय रस्सीखेच अजिंक्यपद स्पर्धांचे भव्य उद्घाटन दिमाखात पार पडले. भारतीय रस्सीखेच संघटना, महाराष्ट्र रस्सीखेच असोसिएशन, अहिल्यानगर जिल्हा रस्सीखेच असोसिएशन व साईबाबा महाविद्यालय, शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गोरक्षनाथ गाडीलकर (भा.प्र.से.), भारतीय रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष मा. हरिशंकर गुप्ता, महासचिव मा. मदन मोहन साहेब, महाराष्ट्र रस्सीखेच संघटनेच्या अध्यक्षा मा. श्रीमती माधवी पाटील व महासचिव मा. जनार्दन गुपीले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.
देशभरातून तब्बल १५ राज्यांतील ६५ संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून १३, १५, १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटांबरोबरच १९ वर्षांखालील व वरिष्ठ गटातील सामने रंगणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धांमधून भारतीय संघाची निवड होणार असल्यामुळे खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह आहे.
या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा रस्सीखेच असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुहास आहेर, सचिव प्रा. बाबा गायकवाड, श्री. सुनील मंडलिक, श्री. राजेंद्र थोरात, श्री. नंदलाल काळण, श्री. भागवत उगले, श्री. निवृत्ती घुले श्री . गणेश खैरे उपाध्यक्ष ओ बी सी मोर्चा श्री.प्रदीप जी वैद्य सामाजिक कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.
उद्घाटनावेळी उपस्थित मान्यवरांनी या स्पर्धांमुळे रस्सीखेच क्रीडेबरोबरच शिर्डीची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, पहिल्याच दिवशी झालेल्या सामन्यांना क्रीडाप्रेमींनी मोठी दाद दिली असून, पुढील तीन दिवस शिर्डीमध्ये रस्सीखेच सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.