shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावे- डाॅ.दिपाली काळे

 श्रीरामपूर ( विशेष प्रतिनिधी ) महिलांनी आर्थिक दृष्टया सक्षम बनावे , चुकीच्या गोष्टीला योग्यवेळी विरोध केला पाहिजे तसेच महिलांनी पहिल्यांदा स्वतःचे करिअर घडवावे असे आवाहन श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलिस अधिक्षक डॉ . दिपाली काळे यांनी व्यक्त केले.
        श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथे प्रियदर्शनी महिला तंत्रशिक्षण मंडळ श्रीरामपूर व साई खेमानंद मेडिकल फौन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या 

       यावेळी खा. सदाशिव लोखडे , जेष्ठ पत्रकार रमण ( आण्णा ) मुथा , डॉ चेतन लोखंडे , प्रियदर्शनी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार धनवटे , प्रफुल वावसे, सुनिल दराडे , रत्नमाला धनवटे , राजश्री वावसे आदी उपस्थीत होते. डॉ. दिपाली काळे यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांनी न घाबरता बोलायला शिकले पाहिजे . स्त्रीभ्रुण हत्येचे समर्थन न करता मी ठरवणार कुणाला जन्म दयायचा तो अधिकार माझा आहे , स्त्री - पुरुष याबद्दल पुरूष जी मानसिकता बाळगतो त्याला विरोध केला पाहिजे, जागतिक स्थरावर महिलांची दखल घेतली जात आहे,महिलांना संरक्षण प्राप्त होत आहे, त्यासाठी प्रथम महिलांनी स्वत: मध्ये बदल करण्याचे आवाहन डॉ. दिपाली काळे यांनी केले . डॉ चेतन लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले 
    यावेळी उंबरगाव , पढेगाव , बेलापूर परिसरातील महिला मोठया संख्येने हजर होत्या. प्रियदर्शनी संस्थेच्या हेमा क्षिरसागर , प्रमिला बोरावके , सुनिता त्रिभुवन , सुनिता क्षिरसागर , रंजना फटांगरे , सिमा आहेर , सायली पुजारी , सुरेखा बनकर , रुपाली बनकर , अलका नरोटे , शिल्पा बोरावके, उमा पडया , उज्वला बनकर , स्वाती लुटे , पलवी जगताप , अंजली वपै  अदिनी कार्यकम नियोजनासाठी परिश्रम घेतले.


शिर्डी एक्सप्रेस साठी आपल्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा-
 shirdiexpress7273@Gmail.com

close