> २० नागरिक गंभीर,९० व्हेंटीलेटरवर तर १००० नागरिक इस्पितळात भर्ती..!!  

आंध्रप्रदेश: आंध्रप्रदेश मधील विशाखापट्टनम पासून १५ किमी वर असलेल्या गोपालपट्टनम परिसरात पाॅलीमर नावाचे केमिकल प्लांट ची कंपनी आहे.सदर कंपनी लाॅकडाऊन नंतर नुकतेच सुरु करण्यात आले होते .या कंपनीत रात्री सुमारे तीन वाजल्यानंतर स्टिरीन नावाच्या विषारी गॅसची अचानक गळती सुरु झाल्यानंतर परिसरातील लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांनी खिडक्या व दरवाजे उघडले परंतू त्यामुळे अनेक नागरिक बेसुध्द पडल्याचे दिसत होते. या घटनेबद्दल काहिच कल्पना न आल्यामुळे आरडाओरड सुरू झाले.काहि जण रस्त्यावर पळत सुटले व रस्त्यावर मृच्छित होऊन पडले,या विषारी वायु गळतीमुळे सरासरी ११ पिडीतांचे मौत झाल्याचे कळते, २० जण सिरीअस असून २०० च्या वर व्हेंटीलेटरवर आहेत तर १००० पिडीतांना इस्पितळात भर्ती करण्यात आल्याचे कळते.जवळ जवळ १०० एम्बुलन्सच्या सहाय्याने मदत कार्य सुरु होते.


         स्टिरीन नावाचे गॅस अति विषारी असून ते हवेत मिसळल्याबरोबर आॅक्सीजन वायुवर त्याचा परिणाम होऊन त्याचा मानवाच्या शरीरातील फुफ्फुसावर,डोके दुखणे,डोळ्यात जलन होणे, उलटी होणे व श्वासोत्सव घेण्यास त्रास होणे व बेशुध्द पडणे इत्यादी घटकांवर त्वरीत परिणाम घडून मृत्युही होतो.

         या विषारी गॅस गळतीमुळे परिसरातील पाच किलोमीटरचे परिसर बाधित झाले आहे. त्यामुळे परिसरातील तीन गावातील नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून तेथून दुसरीकडे हलविण्यात आले आहे.या वायुगळतीवर ताबा मिळविला असून सेवाकार्य जलदगतीने सुरु आहे.

           या विषारी वायुगळतीच्या पार्वभुमीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमितशहा, राहुल गांधी यांनी झालेली घटना अत्यंत दु:खद असून आपण सर्व पिडीतांच्या कुटुंबाबरोबर आहोत असे शोक संदेशात व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदीजी यांनी सदर विषारी वायुगळतीच्या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक घेऊन आंध्रप्रदशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन दिलासा दिला आहे.