shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टिपागडच्या जहाल नक्षली दाम्पत्याला अटक... तर दोन दलम सदस्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण..!!


गडचिरोली: १० ➤   नक्षलविरोधी अभियनाला आज मोठे यश प्राप्त झाले असून टिपागड दलमचा डिव्हिजनल कमिटी मेंबर यशवंत उर्फ दयाराम अंकलू बोगा (३५) आणि त्याची पत्नी टिपागड सदस्य शारदा उर्फ सुमिता पितुराम नैताम (३२) यांना सोमवारी गडचिरोली पोलिसांनी अटक केली. तसेच दलम सदस्य जतीन तुमरेटी (२४) व रंजना मट्टामी (१८) या दोघांनी स्वतःला पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.


             
गडचिरोलीतील टिपागड दलाचा डिव्हिजनल कमिटी मेंबर यशवंत उर्फ दयाराम अंकलू बोगा हा मुळचा आलापल्ली पोलिस ठाण्यांतर्गत येणारचया वडगावचा रहिवासी आहे. याच्यावर ७८ गंभीर गुन्हे दाखल आहे. दहा जाळपोळीच्या घटनांमध्येही याचा सहभाग आहे. हत्तीगोटा मरकेगावासह २०१९ मध्ये दादापूर येथील वाहनांची जाळपोळ यांनी केली होती. १ मे २०१९ रोजी जांभूळखेडा येथे घडून आलेल्या भूसुरुंगस्फोटात याचा सहभाग होता. त्यासोबत त्याचा ३५ चकमकीमध्ये सहभाग होता. त्यांच्याविरुद्ध १६ लाख रुपयाचे बक्षीस सरकारने जाहीर केले होते. त्यांची पत्नी शारदा नैताम हिच्यावर ४७ गंभीर गुन्ह्याची नोंद असून तिच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तर जतीन तुमरेटी(२४) याच्यावर दहा गुन्हे दाखल असून साडेचार लाखांचे बक्षीस तर रंजना मटामी(१८) दलम सदस्य तिच्यावर चकमकीचे चार गुन्हे दाखल असून साडेचार लाखाचे बक्षीस होते. सततच्या होणाऱ्या हिंसाचाराला कंटाळून आपण आत्मसमर्पण केले असे दोन्ही दलम सदस्याचे म्हटले आहे. यांना छत्तीसगड सीमेकडील भागात अटक करण्यात आली व हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणण्यात आले.
             
जहाल नक्षलवादी बोगासह त्यांच्या पत्नीला अटक करणाऱ्या जवानांना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी रोख पारितोषिक जाहीर केले. यावेळी अतिरिक्त पोलीस मोहितकुमार गर्ग, अजयकुमार बन्सल, उपअधीक्षक के. सुदर्शन, भाऊसाहेब ढोले उपस्थित होते.
close