shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अप्पर पिंपरी चिंचवड’च्या नायब तहसीलदारपदी विजयकुमार चोबे..!!

पिंपरी चिंचवड ➤  अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदारपदी परिविक्षाधीन तहसीलदार विजयकुमार चोबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



तहसीलदार गिता गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी  प्रभारी नायब तहसीलदार अंकुश आटोळे, मंडलाधिकरी गणेश सोमवंशी,  अनिल घोडके, भिमाशंकर बनसोडे, धनश्री वाघ, भावना पवार व तलाठी अतुल गिते आदी उपस्थित होते. यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

चोबे यांची निवड तहसीलदार पदाकरीता राज्यसेवा परिक्षा 2017 मध्ये झाली आहे. या परिक्षेत ते राज्यात नवव्या तर तहसिलदार संवर्गात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

यापूर्वी ते राज्याच्या वित्त विभागात अधिकारी श्रेणीत कार्यरत होते. याशिवाय नायब तहसीलदार म्हणून उत्तर सोलापूर, भामरागड (गडचिरोली) व रामटेक (नागपूर) येथेही कार्यरत होते.
close